image-ru-01-02

"हाय, नीरज. मी आहे आकाश विचित्रे, गॅलॅक्टिक रशचा कप्तान

"सुप्रभात, कप्तान."

"शिकण्याची प्रक्रिया कशी आहे आणि आमची सेवा कशी वापरायची हे मी तुला समजावून सांगतो."

"आपले प्राथमिक उद्दिष्ट आहे ते म्हणजे खूप मजा करता करता अशी व्यावहारिक प्रोग्रॅमिंग कौशल्ये मिळवणे, ज्यामुळे प्रोग्रॅमरची नोकरी ज्यामुळे सहज मिळेल. हे साध्य करण्यासाठी, आपण सरावासाठी स्वाध्याय वापरतो. भरपूर स्वाध्याय. खरेच, खूप."

हे सगळे कसे काम करते

संपूर्ण अभ्यासक्रम चार भागात किंवा शोधांमध्ये विभागलेला आहे: जावा सिंटॅक्स, जावा कोअर, जावा मल्टीथ्रेडिंग, आणि जावा कलेक्शन्स. प्रत्येक शोधात दहा पातळया आहेत, आणि प्रत्येक पातळीमध्ये 10-15 धडे आणि 20-30 स्वाध्याय आहेत.

तू पूर्ण केलेल्या प्रत्येक कामासाठी(टास्क), तुला डार्क मॅटरचे काही युनिट्स मिळतील. तुझ्या शोधात पुढे जाण्यासाठी, नवीन पातळया आणि धडे अनलॉक करण्यासाठी तुला डार्क मॅटरची गरज भासेल.

तुला आवडेल त्या कोणत्याही पद्धतीने तुला टास्क्स पूर्ण करता येतील. तू धडे वाचत असताना कामे टास्क करू शकतोस, किंवा धडे वाचून समजून घेऊ शकतोस आणि मग स्वाध्याय स्वतंत्रपणे सोडवू शकतोस. तुला जसे आवडेल तसे कर.

पुढच्या पातळीकडे किंवा धड्याकडे जाणे

पुढच्या पातळीकडे किंवा धड्याकडे जाण्यासाठी ते अनलॉक करायला "पैसे" देण्यासाठी तुला पुरेसे "डार्क मॅटर" गोळा करण्याची गरज आहे. ते थोडेसे असे दिसते:

एका शोधामध्ये, तुला क्रमाक्रमाने धडे अनलॉक करावे लागतील. तू एकदम अभ्यासक्रमाच्या मधल्या भागात जाऊन तिथे काहीतरी करून बघू शकत नाहीस. पण, एकदा एखादा धडा अनलॉक केल्यावर, तो धडा तुला कधीही पाहता येईल. तो धडा परत वाचण्यासाठी किंवा उदाहरणे पुन्हा पाहण्यासाठी तू त्या धड्याकडे कधीही परत जाऊ शकतोस.

तसेच, मी आधी म्हटल्याप्रमाणे, तू टास्क्स पूर्ण करून डार्क मॅटर मिळवू शकतोस. प्रत्येक टास्क पूर्ण केल्यावर तुला किती युनिट्स मिळतील हे त्या टास्कच्या वर्णनात लिहिलेले आहे. उदाहरणार्थ, खालील टास्कसाठी डार्क मॅटरचे 1 युनिट मिळेल.

स्वाध्याय

कोडजिममध्ये, तुला कित्येक वेगवेगळे स्वाध्याय दिसतील. काही मुख्य प्रकार मी येथे देतो.

उदाहरणातला कोड कॉपी करणे — हा एक सर्वांत सोपा स्वाध्याय आहे. तो पूर्ण करण्यासाठी, तुला वरच्या विंडोमध्ये जो जावा कोड दिसतो तो आहे तसाच्या तसा खालच्या विंडोमध्ये प्रविष्ट करायचा आहे.

एक प्रोग्रॅम लिहा — हे या अभ्यासक्रमातले सर्वांत महत्त्वाचे स्वाध्याय आहेत. त्यांची काठीण्यपातळी बरीच वेगवेगळी असू शकते: छोट्या आणि सोप्या टास्कपासून तुझ्या मेंदूला पुष्कळ ताण द्यावा लागेल अशा अवघड टास्कपर्यंत... "उपलब्ध" असे अंकित केलेल्या कोणत्याही टास्कवर तू काम करायला सुरू शकतोस. टास्क सुरू करण्यासाठी, फक्त टास्कच्या वर्णनातील "उघडा" या बटणावर क्लिक कर.

म्हणजे वेब आयडीइ उघडले जाईल. पहिल्या टॅबमध्ये टास्कच्या अटी आहेत. दुसऱ्या टॅबमध्ये तू कोड टाईप करशील. डावीकडे तुला प्रोजेक्ट ट्री दिसेल (याबद्दल अधिक माहिती नंतर).

तू टास्क यशस्वीपणे पूर्ण केलीस का? हे तपासण्यासाठी, तुला "पडताळून पहा" बटणावर क्लिक करावे लागेल. तसे केले की तुझा प्रोग्रॅम आमच्या सर्व्हरकडे पडताळणीसाठी जाईल आणि मग तुला निकाल दिसेल.

जर तुला प्रोग्रॅम पडताळून न पाहता नुसताच एक्झिक्युट करायचा असेल, तर फक्त "रन" बटणावर क्लिक कर.

जर तू चुकून सुरुवातीचा कोड डीलीट केलास, तर तू नेहमीच "रीसेट" बटणावर क्लिक करून पहिल्यापासून सुरुवात करू शकतोस.

छोटे प्रोजेक्ट्स तयार करणे — हे सर्वांत मनोरंजक आणि आव्हानात्मक स्वाध्याय आहेत! छोट्या प्रोजेक्टमध्ये एकमेकांना जोडलेल्या सब-टास्क्सची एक मालिका असते. शेवटी पोचेपर्यंत, तू तुझा स्वत:चा एका छोटा प्रोजेक्ट तयार केलेला असेल, उदा. एखादा गेम वगैरे. पण तुला तुझा पहिला छोटा प्रोजेक्ट तयार करायला मिळण्यापूर्वी, तुला बरेच काम करायचे आहे. पातळी 20 ला पोचेपर्यंत तुला तुझा पहिला छोटा प्रोजेक्ट दिसणार नाही.

कोडींग किड्याला विश्रांती — हे सर्वांत अवघड स्वाध्याय आहेत! मजा करतोय! बऱ्याचदा "विश्रांती" मध्ये एक छान तंत्रज्ञानाबद्दलचा व्हिडीओ पाहणे असू शकते. आणि हो, तरीसुद्धा या स्वाध्यायांसाठीही तुला डार्क मॅटर बक्षीस मिळणार आहे.

ता.क.: पातळी 3 पासून, तुला इंटेलीजे आयडीया नावाचे इंटिग्रेटेड डेव्हलपमेंट एन्व्हायर्नमेंट(आयडीइ) वापरून टास्क्स करता येतील. एका धड्यात तुला ते कसे करायचे हे शिकवले जाईल, पण आम्ही तुला त्याबद्दल अधिक माहिती नंतर सांगू.

धडे आणि टास्क स्थिती

टास्कची स्थिती खालीलपैकी असू शकते. "उपलब्ध" — सुरुवात कर आणि पूर्ण करण्याचा प्रयत्न कर!

"पूर्ण झाले" — तू ही टास्क यशस्वीपणे पूर्ण केली आहेस आणि तीन दिवसांपेक्षा कमी काळापूर्वी तुझे डार्क मॅटर मिळवले आहेस. तुझे सोल्युशन सुधारण्यासाठी तू हे पुन्हा सोडवण्याचा प्रयत्न करू शकतोस.

"बंद केले" — तू ही टास्क यशस्वीपणे पूर्ण केली आहेस आणि तीन दिवसांपेक्षा कमी वेळापूर्वी तुझे डार्क मॅटर मिळवले आहेस. तू ही टास्क आता पडताळणीसाठी पाठवू शकत नाहीस.

"लॉक केले आहे" - मला वाटते याचा अर्थ स्पष्टच आहे. ही टास्क पाहण्यापूर्वी, तू याच्याशी संबंधित धडे अनलॉक करणे आवश्यक आहे. आणि त्यासाठी तू इथेपर्यंतचे सर्व धडे अनलॉक करणे आवश्यक आहे.

धड्यांच्या संभाव्य दोन स्थिती आहेत: "उपलब्ध" आणि "लॉक केले आहे".

"लॉक केलेल्या" धड्यांच्या मोठ्या मालिकेच्या आधीच्या शेवटचा "उपलब्ध" धडा म्हणजे जिथे तू थांबलास तो. जर तू "लॉक केलेल्या" पहिल्या धड्यावर क्लिक केलेस, तर तुला तो अनलॉक करण्यासाठी डार्क मॅटरची विशिष्ट रक्कम देण्यासाठी सांगितले जाते.