"हाय, नीरज."

"हॅलो, इरावती काणे."

"मला फक्त इरा म्हण. इतक्या औपचारिकतेची गरज नाही."

"ठीक आहे, इरा."

"माझा विश्वास आहे की माझ्या मदतीमुळे तू लवकरच सर्वोत्तमांपैकी एक होशील. नवशिक्यांना प्रशिक्षण देण्याचा मला खूप अनुभव आहे. माझ्याबरोबर राहा आणि सगळे काही व्यवस्थित होईल. ठीक आहे, चला, सुरुवात करूया."

"जावामध्येदोन महत्त्वाचे डेटा प्रकार आहेत: String आणि int. आपण स्ट्रिंगमध्ये स्ट्रिंग्ज/मजकूर साठवतो, आणि इंटमध्ये इंटीजर्स(पूर्णांक संख्या). नवीन व्हेरीएबल डीक्लेअर करण्यासाठी, आपल्याला त्याचा प्रकार आणि नाव सांगावे लागते. हे नाव आणि इतर कोणत्याही व्हेरीएबल्स आणि/किंवा फंक्शनचे नाव सारखे असू शकत नाही."

उदाहरण 1, कोड: वर्णन
String s;
एक नवीन व्हेरीएबल s डीक्लेअर करण्यात आला आहे. तो मजकूर साठवू शकतो.
int i;
एक नवीन व्हेरीएबल i डीक्लेअर करण्यात आला आहे. तो पूर्णांक संख्या साठवू शकतो.

"व्हेरीएबल्स डीक्लेअर करताना आपण त्यांना मूल्य देऊ शकतो."

उदाहरण 2, कोड: वर्णन
String s = "Eera";
व्हेरीएबल s "Eera" हा स्ट्रिंग साठवतो.
int i = 5;
व्हेरीएबल i 5 ही संख्या साठवतो.

"व्हेरीएबलला नवीन मूल्य देण्यासाठी, आपण = हे चिन्ह वापरतो. त्याला 'असाईनमेंट ऑपरेटर' असेसुद्धा म्हणतात.. असाईनमेंट म्हणजे एका व्हेरीएबलमध्ये दुसऱ्या व्हेरीएबलमधले किंवा अनेक व्हेरीएबलमधून गणन करून काढलेले मूल्य घालणे."

उदाहरण 3, कोड: वर्णन
int a = 5;
व्हेरीएबल a 5 हे मूल्य साठवतो.
int b = 6;
व्हेरीएबल b 6 हे मूल्य साठवतो.
int c = a + b;
व्हेरीएबल c 11 हे मूल्य साठवतो.

"व्हेरीएबलचे मूल्य नवे मूल्य काढण्यासाठी वापरता येते आणि जुन्या मूल्याच्या जागी हे नवे मूल्य घालता येते."

उदाहरण 4, कोड: वर्णन
int a = 2;
आता a चे मूल्य आहे 2
int b = 3;
आता b चे मूल्य आहे 3
a = a + b;
आता a चे मूल्य आहे 5
b = b + 1;
आता b चे मूल्य आहे 4

"आपण + चिन्ह वापरून स्ट्रिंग्ज एकत्र करू शकतो.

उदाहरण 5, कोड: वर्णन
String s1 = "Rain";
String s2 = "In";
String s3 = s1 + s2 + "Spain";
व्हेरीएबल s3 मध्ये "RainInSpain" हा स्ट्रिंग साठवलेला आहे.

"कधीकधी स्ट्रिंगमध्ये एक किंवा दोन रिकाम्या जागा(स्पेसेस) असतात, ज्या उपयुक्त असतात:"

उदाहरण 6, कोड: वर्णन
String s1 = "My favorite movie is";
String s2 = "Route";
int roadNumber = 66;
String text = s1 + " " + s2 + " " + roadNumber;
text "My favorite movie is Route 66" साठवतो.

"आपण स्क्रीनवर मजकूर आणि व्हेरीएबल्स कसे दाखवतो ते एकदा बघूया:"

उदाहरण 7, कोड:
1
System.out.println("A man's gotta do what a man's gotta do");
2
String s = "A man's gotta do what a man's gotta do";
System.out.println(s);

"बरं, धीरजने मला सांगितले होते, तुला दोन स्वाध्याय द्यायला:"

1
टास्क
जावा सिंटॅक्स,  पातळी 1धडा 4
लॉक केलेले
कोडजिम एकदा शिका- कोठेही वापरा
हे एक कोडे आहे: "एकदाच लिहिलेले, हे सगळीकडे चालते." उत्तर: जावा प्रोग्रॅम हे बरोबर उत्तर आहे, कारण जावा तार्किक पद्धतीने आणि योग्यप्रकारे रचना केलेली भाषा आहे. ही घोषणा विद्यार्थ्यांसाठी थोडी वेगळ्या शब्दात देऊया: "एकदा शिका- कोठेही वापरा!" या विषयावर इथे एक छोटीशी टास्क दिलेली आहे: एक उपयुक्त वाक्य 10 वेळा स्क्रीनवर लिहिणारा प्रोग्रॅम लिही.
1
टास्क
जावा सिंटॅक्स,  पातळी 1धडा 4
लॉक केलेले
अं... नवीन वर्षाच्या शुभेच्छा!
आपण आपला अभ्यास सोडून नाही दिला तर काय होईल? आपण टास्क पूर्ण करत राहिलो आणि धडे शिकत राहिलो तर काय होईल? जर तू हे करत राहिलास, तर पुढच्या नवीन वर्षापर्यंत, ज्याला अजून निदान तीन महिने अवकाश आहे, तू नवीन वर्ष एक खरा प्रोग्रॅमर म्हणून साजरे करू शकतोस! हेच तर स्वप्न आहे. पण सध्या, चला, कामाला लागू या. अनावश्यक कमेंट्स काढूया आणि नवीन वर्षाच्या शुभेच्छा दाखवूया!
1
टास्क
जावा सिंटॅक्स,  पातळी 1धडा 4
लॉक केलेले
चला, कोड बदलूया
दुसऱ्या कोणाचातरी कोड बदलणे हे काहीवेळा स्वत:चा कोड लिहिण्यापेक्षा जास्त अवघड असते. सीक्रेट कोडजिम केंद्रातल्या तज्ज्ञांच्या अनुभवावर तू विश्वास ठेवू शकतोस. त्यामुळेच आमच्या अभ्यासक्रमात कोड दुरुस्त करण्याच्या टास्क्स आहेत. सध्या, आपण आपले पाठ्यपुस्तक उघडूया, थोड्या सोप्या कोडवर विचार करूया, आणि मग कोड बदलूया म्हणजे name हे व्हेरीएबल "Neeraj" हे मूल्य घेईल.
1
टास्क
जावा सिंटॅक्स,  पातळी 1धडा 4
लॉक केलेले
अजून काही दुरुस्त्या
"महान प्रोग्रॅमर होण्यासाठी 1001 सल्ले" यासारख्या लेखात नेहमीच "दुसऱ्याचा कोड तुम्हाला स्वत:चा कोड कसा लिहायचा ते शिकवेल" असे वाक्य असते. प्रोग्रॅमर क्वचितच एकटा काम करतो, त्यामुळे हा सल्ला म्हणजे निखळ सत्य आहे. त्याकडे दुर्लक्ष करून तू कुठेच पोचू शकणार नाहीस. आपल्याला सांघिक कार्याची आणि इतर लोकांच्या कोडमध्ये दुरुस्त्या करण्याची सवय करून घेतली पाहिजे.
1
टास्क
जावा सिंटॅक्स,  पातळी 1धडा 4
लॉक केलेले
अनावश्यक गोष्टी कमेंट करणे
पहिल्या नजरेत वाटतात त्यापेक्षा कमेंट्स खूप जास्त उपयुक्त असतात! तुमचे अगदी मनातले विचार कम्पायलरपासून लपवण्यासाठी तुम्ही त्यांचा वापर करू शकता! फक्त तुमचे सहकारी प्रोग्रॅमर्स त्या वाचू शकतात. असे असले तरीही, आपल्या प्रोग्रॅममध्ये काही जास्तीच्या ओळी आहेत, ज्यामुळे आपला प्रोग्रॅम पाहिजे तसा काम करत नाही. त्या अनावश्यक ओळी कमेंट करून समस्या सोडव.
1
टास्क
जावा सिंटॅक्स,  पातळी 1धडा 4
लॉक केलेले
मी पुन्हा 15 वर्षांचा झालो!
तुझ्यासमोर दुसऱ्या कोणाचातरी कोड आहे. तो गूढ आहे आणि चुकीचा आहे. पण प्रोग्रॅमिंगची ताकद तुझ्या हातात एकवटली आहे. तू सगळे काही बदलू शकतोस, आणि अगदी कम्पायलरसुद्धा तुला या कामात मदत करेल. नाजूक संतुलन आणि शांतता पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी तुला काय करावे लागेल? प्रोग्रॅम अशाप्रकारे बदल की व्हेरीएबल age चे मूल्य 15 होईल.
1
टास्क
जावा सिंटॅक्स,  पातळी 1धडा 4
लॉक केलेले
फक्त 20 पुरेत.
अनेक प्रोग्रॅमर्सना मेंदूला खाद्य पुरवणारी कोडी खूप आवडतात. रुबिकचा क्यूब, 'काड्यापेटीतल्या दोन काड्या वापरून 100 तयार करा", हनोईचा मनोरा, आणि इतर. त्यांचे मेंदू तशाप्रकारे तयार झालेले असतात. काही मेंदूला खाद्य पुरवणारे प्रोग्रॅम सोडवूया. या उदाहरणात, अधिक आणि उणे चिन्हे अशाप्रकारे वापर की व्हेरीएबलचे उत्तर 20 इतके येईल.