करून पाहून जावा शिका
सुरुवातीपासून कोडींग शिकाजावा कोडींगचा सराव करण्यासाठी ही सर्वोत्तम जागा आहे.
हा जावा ऑनलाईन अभ्यासक्रम म्हणजे 80% सराव
इंटरनेटवर असंख्य चांगली पुस्तके आहेत, पण ती पुस्तके वाचून तुम्हाला प्रोग्रॅमर होता येणार नाही.जावा शिकण्यासाठी आणि प्रोग्रॅमर होण्यासाठी, तुम्ही भरपूर कोड लिहिण्याची गरज आहे.CodeGymहा 80% सरावावर आणि 20% जावाच्या आवश्यक थेअरीवर आधारीत असलेला एक ऑनलाईन जावा प्रोग्रॅमिंग अभ्यासक्रम आहे.खरा जावा डेव्हलपर होण्यासाठी तुम्हाला हे आवश्यक आहे.
1200+ टास्क्स सोडवून जावा शिकणे
एका परिपूर्ण जावा ऑनलाईन अभ्यासक्रमात किती टास्क्स असल्या पाहिजेत? 10, 20, 100? CodeGym अभ्यासक्रमात वाढत्या काठिण्य पातळीच्या 1,200 हँड्स-ऑन टास्क्स आहेत. या टास्क्स लहान आहेत, पण त्यांची संख्या खूपच जास्त आहे (खूप म्हणजे खूपच). तुम्ही टनावारी जावा कोड लिहाल. तुम्हाला नोकरी मिळण्यासाठी आवश्यक असलेला अनुभव देण्यासाठी हे पुरेसे आहे.
क्षणार्धात टास्क पडताळणी
कधीकधी तुमच्या शिक्षकांकडून असाईनमेंट्स तपासून घेण्यासाठी आणि त्यावर अभिप्राय घेण्यासाठी तुम्हाला अनंत काळ लागतो. आम्ही ते बदलले आहे. वाट पाहण्यात तुमचा वेळ वाया घालवू नका! आमचा सर्वशक्तीमान आभासी मार्गदर्शक तुमची सर्व सोल्युशन्स डोळ्याचे पाते लवते न लवते तोच तपासून देईल!
जावाच्या मूलभूत गोष्टींवर प्रभुत्व येण्यासाठी उच्च दर्जाचे प्रशिक्षण
अभ्यास करणे कंटाळवाणे असता कामा नये! त्यामुळेच आमचे जावा ट्युटोरीयल तुमचे शिक्षण अधिक सोपे, अधिक मनोरंजक आणि उत्पादक बनवण्यासाठी सर्वांत नवीन तंत्रे वापरते: व्हिज्युअलायझेशन, कथाकथन, प्रेरणा, गेमिंग, आणि दोन डझन इतर तंत्रे, जी तुम्ही कधी ऐकलीसुद्धा नसतील. फारच उत्साहवर्धक वाटतेय?
500+ तासांचा जावाचा सराव आणि कोडींग
हा जावा अभ्यासक्रम 40 पातळ्यांमध्ये विभागलेला आहे. जर तुम्ही सध्याच्या पातळीतील बहुतांशी टास्क्स पूर्ण केल्या असतील तरच तुम्ही पुढच्या पातळीला जाऊ शकता. सुरुवातीला टास्क्स लहान आणि सोप्या असतात, पण पुढेपुढे मोठ्या आणि फार उपयुक्त होतात. तुमच्या मेंदूला चांगलाच व्यायाम मिळेल! जो कोणी शेवटपर्यंत पोचेल, त्याला 500+ तासांचा जावा प्रोग्रॅमिंगचा अनुभव मिळेल. विजयासाठी आणि नोकरीसाठी ही चांगली बोली आहे.
तुम्हाला हवे असेल तेव्हा जावा ऑनलाईन शिका
हा अभ्यासक्रम संपूर्णपणे तुमच्या गतीने चालतो. तुम्हाला ग्रुप तयार होण्यासाठी आणि अभ्यासक्रम सुरू होण्यासाठी काही आठवडे किंवा महिने वाट पहावी लागत नाही. फक्त "शिकायला सुरुवात करा" बटणावर क्लिक करा, आणि जावाच्या अद्भुत जगात उडी मारा!