सर्व CodeGym शोधांना प्रवेश
CodeGymच्या जावा प्रोग्रॅमिंग अभ्यासक्रमामध्ये 4 शोध आहेत: जावा सिंटॅक्स, जावा कोअर, जावा कलेक्शन्स, आणि मल्टीथ्रेडिंग.
ह्या शोधांमध्ये पाचशेहून अधिक छोटे धडे आहेत आणि एक हजाराहून अधिक स्वाध्याय. या टास्क्सची काठीण्यपातळी हळूहळू वाढत जाते, अगदी जिममधील बारवर असलेल्या वजनाप्रमाणे: दररोज या वजनात थोडीशी वाढ केल्यास अंतिमत: सहज लक्षात येणारे परिणाम दिसून येतील. हा अभ्यासक्रम संपेपर्यंत, तुम्ही 500 ते 1000 तासांचा प्रोग्रॅमिंगचा अनुभव मिळवलेला असेल.
हा अभ्यासक्रम तुम्हाला जावाविषयी सर्व आवश्यक विषयांची ओळख करून देईल, यामध्ये समाविष्ट आहे: जावा सिंटॅक्स, स्टॅंडर्ड टाईप्स, अॅरेज, लिस्ट्स, कलेक्शन्स, जेनेरिक्स, एक्सेप्शन्स आणि थ्रेड्स, फाइल्स, नेटवर्क आणि इंटरनेटसह कसे काम करावे. याबरोबरच तुम्ही शिकाल ओओपी, सिरिअलायझेशन, रिकर्शन, अॅनोटेशन्स, वारंवार वापरले जाणारे डिझाइन पॅटर्न्स, आणि बरंच काही.
शोध नकाशामध्ये शिक्षणाचा तपशीलवार आराखडा पहा.