CodeGym /Java Course /जावा सिंटॅक्स /प्रोग्रॅमची ओळख

प्रोग्रॅमची ओळख

जावा सिंटॅक्स
पातळी 1 , धडा 1
उपलब्ध

"हॅलो, माझ्या तरुण मित्रा. मी 16 व्या पिढीतला नोकरशहा आहे हे तू विसरला नसशील अशी आशा आहे. जर मी माझे सगळे ज्ञान व्यवस्थित ठेवले नसते, तर मी आत्ता जे यश मिळवले आहे ते कधीच मिळवू शकलो नसतो. उपयुक्त माहितीचा साठा आहे माझ्याकडे. मी तुला काही गोष्टी करायला मदत करणार आहे. सुरुवातीला, मी तुला एका सर्वसामान्य जावा प्रोग्रॅमबद्दल सांगतो."

"मी ऐकतोय."

"तथ्य क्रमांक एक. जावा प्रोग्रॅम क्लासेसचा बनलेला असतो. प्रत्येक क्लास एका वेगळ्या फाईलमध्ये साठवलेला असतो, त्या फाईलचे नाव आणि क्लासचे नाव सारखेच असते. फाईल एक्स्टेन्शन असते java."

"तर, एक प्रोग्रॅम 'जावा' फाईल एक्स्टेन्शन असलेल्या फाईल्सच्या मालिकेचा बनलेला असतो, आणि प्रत्येक फाईलमध्ये केवळ एकाच क्लाससाठीचा कोड असतो, बरोबर?"

"हो, अगदी बरोबर, नीरज. जर फाईलचे नाव MyCat.java असेल तर फाईलमध्ये MyCat क्लास असतो."

"तथ्य क्रमांक दोन. जेव्हा आपल्याकडे अनेक क्लास फाईल्स असतात, तेव्हा आपण त्यांचे फोल्डर्स आणि सबफोल्डर्समध्ये एकत्रीकरण करतो. त्याशिवाय, क्लासेसचे पॅकेजेस आणि सब-पॅकेजेसमध्ये एकत्रीकरण केले जाते. पॅकेजेस आणि सब-पॅकेजेसची नावे क्लास कोडमध्ये दर्शवावी लागतात, आणि ती ड्राईव्हवरील फोल्डर्स आणि सबफोल्डर्सच्या नावांप्रमाणेच असावी लागतात."

"अशाप्रकारे, एकीकडे, आपण फोल्डर्समध्ये फाईल्स साठवतो, आणि दुसरीकडे - पॅकेजेसमध्ये क्लासेस साठवतो. क्लासचे वर्णन करणाऱ्या फाईलचे नाव आणि क्लासचे नाव एकच असले पाहिजे. पॅकेजचे नाव आणि ज्या फोल्डरमध्ये क्लास साठवलेला आहे, त्या फोल्डरचे नाव सारखेच असते."

"तू मला अजून काही तपशील सांगू शकतोस का?"

"नेस्टेड पॅकेजेसची नावे पूर्णविरामाने विभागलेली असतात, जवळजवळ युआरएलप्रमाणे."

"वेगळ्या शब्दांत सांगायचं तर, समजा तुझ्याकडे animals.pets पॅकेजमध्ये साठवलेला कॅट नावाचा क्लास आहे. त्याचाच अर्थ:

हार्ड ड्राईव्हवर एखादे फोल्डर आहे (आपण त्याला srcम्हणू) जिथे सगळ्या प्रोजेक्ट फाईल्स साठवलेल्या आहेत.

त्यामध्ये animals नावाचे एक फोल्डर आहे, ज्यात पुन्हा pets नावाचे एक सबफोल्डर आहे.

pets फोल्डरमध्ये एक Cat.java फाईल आहे, ज्यात Cat क्लासचा कोड आहे."

"मला व्यवस्थित समजले आहे असे वाटत नाही."

"हे बघ. क्लासेस आणि पॅकेजेसची रचना ड्राईव्हवरच्या फोल्डर्स आणि फाईल्सच्या रचनेप्रमाणेच असते. जर आपल्याकडे src/com/houses फोल्डरमध्ये साठवलेली House.java, नावाची फाईल असेल तर, com.houses पॅकेजमध्ये House नावाचा क्लास असतो."

"कळले."

"तुला सगळे लगेचच समजते आहे असे दिसते. स्क्रीनवर बघ. हा एका छोट्या क्लाससाठीचा कोड आहे. मी सर्व महत्त्वाच्या भागांना नावे दिलेली आहेत:"

        पॅकेजचे नाव
package com.futujava.lesson2;
import java.io.IOException;
/**
 * वापरकर्ता: सामान्य
 * दिनांक: 12/21/12
 * वेळ: 11:59
 */
             क्लासचे नाव
public class Task1
{
                                                              
   private static String TEXT = "Kiss my metal rear actuator";⎥ क्लास व्हेरीएबल
                                                              
                                                                
   public static void main(String[] args) throws IOException    
   {                                                            
      स्क्रीन आऊटपुट                    एका ओळीची कॉमेंट           
      System.out.println(TEXT); //एक स्ट्रिंग दाखवा 
        अनेक ओळींची कॉमेंट                                        
      /*                                                        
        ही अनेक ओळींची कॉमेंट आहे.                                
        खाली दिलेला कोड तीन समान स्ट्रिंग दाखवेल.                     ⎥ main() मेथड
       */                                                       
      व्हेरीएबल डीक्लेरेशन                                           
      String s = "Ho-ho-ho!";                                   
      मेथड कॉल                                                  
      printTextMoreTimes(s, 3);                                 
   }                                                            
                                                                
                                          मेथड पॅरामीटर्स           
   public static void printTextMoreTimes(String s, int count)   ⎥ मेथड सिग्नेचर
                                                            
                                                                
   {                                                            
      लूप                                                       
      for (int i = 0; i < count; i++)                           
      लूपमधील मजकूर                                             ⎥ मेथडमधील मजकूर/कोड
      {                                                         
         System.out.println(s);                                 
      }                                                         
   }                                                            

}

"वा, फक्त एकदाच समजावल्यावर हे आता अगदी स्पष्ट झाले आहे."

"छान! आपल्याला फक्त याचीच गरज आहे. फक्त काहीतरी समजून घेण्याचा प्रयत्न कर. काही वेळ गेला की मग सगळे समजेल. आता मी थोडी झोप काढणार आहे. दुसरे कोणीतरी तुझे प्रशिक्षण सुरू ठेवेल."

टिप्पण्या
TO VIEW ALL COMMENTS OR TO MAKE A COMMENT,
GO TO FULL VERSION