"नमस्कार, धीरज, माझ्या सर्वोत्तम नवशिक्या शिष्या! (खरे म्हणजे, माझ्या सर्वोत्तम शिष्यांपैकी एक) कसे काय चाललेय? मी ऐकले की तू नुकताच तुझा पहिला जावा प्रोग्रॅम तयार केलास...कूल, हो ना?"

"हो. मजा आली...खूप मजा आली, आणि मला ते आवडते, पण..."

"मला तुझ्या आवाजात थोडी शंका दिसतेय. काही चुकले का?"

"नाही, ठीक आहे. मला तुला एक प्रश्न विचारायचा आहे. जावा हीच बरोबर भाषा का आहे? मी असे ऐकले आहे की काही प्रोग्रॅमिंग भाषा इतर प्रोग्रॅमिंग भाषांपेक्षा शिकायला सोप्या असतात, काही वेबसाईटसाठी...किंवा गेम विकसित करण्यासाठी जास्त चांगल्या असतात. जावा कशासाठी सर्वोत्तम आहे?"

"चांगला प्रश्न आहे! उत्तर एकाच वेळी सोपे पण आहे आणि गुंतागुंतीचे पण आहे. मी गुंतागुंतीच्या भागापासून सुरुवात करतो."

"जावा सगळीकडे आहे. अगदी कुठेही तुम्हाला इंटरनेट, मोबाईल अॅप्स, ओएस, एम्बेडेड सिस्टीम्स, रीअल-टाईम सॉफ्टवेअर, डेटा मायनिंग, क्लाऊड कॉम्प्युटिंग, इ.दिसते."

"समस्या ही आहे की वापरकर्त्याला सामान्यपणे जावा दिसत नाही - कारण जावा सामान्यपणे सर्व्हरवरची अॅप्लिकेशन्स लिहीण्यासाठी वापरली जाते, अनेकवेळा कोणत्याही फ्रंट एंडशिवाय. आणि वापरकर्त्यांना बऱ्याचदा फक्त फ्रंट एंडच माहिती असते."

जावा एंटरप्राईजमध्ये #1 आहे

"याचा अर्थ कंपन्या वापरत असलेली बरीचशी अॅप्लिकेशन्स जावामध्ये लिहिलेली असतात."

"उदाहरणार्थ, वित्तीय सेवा उद्योगातील सर्व्हर अॅप्लिकेशन्स सामान्यपणे जावामध्ये लिहिलेली असतात. अनेक बँकांचे आयटी विभाग फ्रंट आणि बॅक एंड इलेक्ट्रॉनिक व्यापार प्रणाली, व्यवहार पूर्तता आणि पेमेंट पुष्टी प्रणाली, डेटा प्रक्रिया प्रणाली आणि इतर अनेक गोष्टींसाठी जावा वापरतात."

"अनेक वेब अॅप्सची सर्व्हर साईडसुद्धा जावामध्ये तयार केलेली असते. शैक्षणिक, सरकारी, आरोग्यसेवा आणि इतर संस्थांच्या वेब अॅप्समध्ये तुला ही भाषा दिसेल."

प्रोग्रॅमर्ससाठी साधने

"सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटची साधनेसुद्धा अगदी बऱ्याच वेळा जावामध्ये विकसित केलेली असतात. तुला त्यातली काही पुढच्या पातळ्यांमध्ये शिकता येतील, असे मी आश्वासन देतो."

बिग डेटामध्ये जावा मोठ्या प्रमाणात आहे

"हडूप आणि इतर अनेक बिग डेटा तंत्रज्ञानेसुद्धा जावा वापरतात. इलॅस्टिक सर्च, एचबेस आणि अक्युम्युलोबद्दलसुद्धा तेच म्हणता येईल."

"शास्त्रीय अॅप्लिकेशन्स आणि कॅलक्युलससाठी अभियंते जावा वापरतात."

अँड्रॉइड आणि मोबाईल अॅप्स

"आणि, मला खात्री आहे की तुला आधीपासूनच माहिती असेल, मोबाईल अॅप्स तयार करण्यासाठी आपण जावा वापरू शकतो, कारण अँड्रॉइड हे एकदम जावा-स्नेही एनव्हायरमेंट आहे. कोणत्या भाषेत सर्वांत जास्त अँड्रॉइड अॅप्स लिहिली जातात?"

"अर्थातच, जावामध्ये. धन्यवाद, कप्तान. मला कळले."

"थांब, माझ्याकडे तुझ्यासाठी काही चांगली उदाहरणे आहेत:

  • माईनक्राफ्ट, जगातील सर्वांत लोकप्रिय सर्व्हायवल सँडबॉक्स गेम, मार्कस 'नॉच' पर्सनने लिहिला आणि, हो, त्याने जावा वापरली.
  • गुगल+ (संपूर्ण सर्व्हर साईड) आणि इतर अनेक गुगल सेवा.
  • सर्वोत्तम डेव्हलपमेंट साधने, उदा. इक्लिप्स आणि इंटेलिजे आयडीया (तुला आयडीयाबद्दल अधिक माहिती नंतर कळेल.)
  • अँड्रॉइडसाठी फेसबुक वेब अॅप...आणि तुम्ही वापरत असलेली इतर बहुतेक सर्व अँड्रॉइड अॅप.
  • अॅमॅझॉन वेब सर्व्हिसेस. हो, जेव्हा तू अॅमॅझॉनवरून खरेदी करतोस, तेव्हा तू जावा वापरत असतोस. तू कल्पना करू शकतोस का?
  • नेटफ्लिक्सच्या बऱ्याचशा सेवा जावावर आधारित विकसित करण्यात आलेल्या आहेत. तू तुझा आवडता कार्यक्रम बघताना हे लक्षात ठेव.
  • अँड्रॉइड ऑपरेटिंग प्रणाली सी आणि सी++ बरोबर जावामध्ये (युजर इंटरफेस) लिहिण्यात आलेली आहे.
  • अनेक टेस्ला मोटर्स अॅप्लिकेशन्स जावामध्ये तयार करण्यात आलेली आहेत.
  • आणि शेवटी सांगायचे तर कोडजिमची सर्व्हर साईड जावामध्ये लिहिण्यात आलेली आहे (काय आश्चर्य!).

शिकणे चालू ठेवण्याची ही वेळ आहे, माझ्या मित्रा. चांगले काम सुरू ठेव!"