"मीच आलोय परत! मला वाटतेय की महत्त्वाचे निर्णय घेणे सुरू करण्यासाठी तुझ्याकडे आता पुरेशी माहिती आहे. तुझ्या नव्या मालकाशी करार करण्याची वेळ आता आली आहे. तुला एक अर्ज भरावा लागेल. हा आहे एक नेहेमीचा फॉर्म. त्यातला मजकूर फक्त स्क्रीनवर दाखव की झाले. न वाचता त्यावर स्वाक्षरी कर. तेच मी नेहमी करतो."
स्वाध्याय: खालील मजकूर स्क्रीनवर दाखवणे |
---|
My name is Neeraj.
I agree to wages of $10/month in the first year. धन्यवाद, मित्रा ऋषी, तुझ्या औदार्याबद्दल! |
नीरजने एक क्षणभर विचार केला:
"हे मला फार जास्त वाटत नाही आहेत. मला आठवतेय हे एक वाक्य मला धीरजने शिकवले होते..."
नवा स्वाध्याय: खालील मजकूर स्क्रीनवर दाखवणारा प्रोग्रॅम लिही: |
---|
My name is Neeraj.
I agree to wages of $5000/month in the first year. Kiss my shiny metal rear actuator! |
ऋषी परत आला.
"काय मग, कसे काय चाललेय?"
"तयार आहे. मी त्यावर स्वाक्षरी केली आहे."
"छान! मीसुद्धा न बघता स्वाक्षरी करेन. इथे गॅलॅक्टिक रशवर, आम्ही कधीही एकमेकांना फसवत नाही."
हा-हा. धन्यवाद, मित्रा ऋषी, तुझ्या औदार्याबद्दल!"
GO TO FULL VERSION