(एका तासानंतर)

"मस्त! आपण कुठे थांबलो होतो?"

"मेथडच्या आतला कोड किंवा तसलेच काहीतरी."

"बरोबर. अगदी तेच. मेथडची बॉडी(मुख्य भाग) कमांडचा बनलेली असते. आपण असेसुद्धा म्हणू शकतो की मेथड म्हणजे एक नाव दिलेला (मेथडचे नाव)कमांडचा गट. दोन्ही विधाने खरी आहेत."

"अनेक प्रकारच्या कमांड आहेत. तुझ्या ग्रहावर कुत्री आहेत का?"

"फक्त पाळीव यंत्रमानव लांडगे."

"ते आज्ञा पाळतात का?"

"हो. 'चाव','खा','फाड', आणि 'छान! चाल!"

"हं. छान आहेत आज्ञा! पण फार नाही आहेत."

"आपल्याला किती आवश्यक आहेत?"

"जावा भाषेत प्रत्येक प्रसंगासाठी कमांड आहेत. प्रत्येक कमांड कोणत्या तरी कृतीचे वर्णन करते. प्रत्येक कमांडच्या शेवटी, आपण एक अर्धविराम वापरतो."

"ही कमांडची काही उदाहरणे आहेत:"

कमांड वर्णन (ती काय करते)
System.out.println(1);
स्क्रीनवर 1 ही संख्या दाखवते
System.out.println("Neeraj");
स्क्रीनवर "Neeraj" दाखवते
System.out.println("Rishi & Neeraj");
स्क्रीनवर "Rishi & Neeraj" दाखवते

"खरे म्हणजे, ही एकच कमांड आहे System.out.println. कमांडला अर्ग्युमेंट पुरवण्यासाठी आपण कंसाचा वापर करतो. अर्ग्युमेंटच्या मूल्यानुसार, एकच कमांड वेगवेगळ्या कृती करू शकते."

"हे फारच सोयीचे आहे."

"हो. जर तुला स्क्रीनवर काही मजकूर दाखवायचा असेल तर त्याच्या दोन्ही बाजूला अवतरण चिन्हे द्यावी लागतात.

एकेरी अवतरण चिन्ह असे दिसते: '. दुहेरी अवतरण चिन्ह असे दिसते: ". दुहेरी अवतरण चिन्ह म्हणजे दोन एकेरी अवतरण चिन्हे नव्हेत. कृपया त्यामध्ये गोंधळ होऊ देऊ नकोस."

"दुहेरी अवतरण चिन्हाची कळ(की) कीबोर्डवरच्या एंटर बटणाशेजारी असते, हो ना?"

"बरोबर."

नीरजची नाडी 3 च्या ऐवजी 5 गिगाहर्ट्झ इतकी वेगाने धडधडू लागली. त्याचा अजूनही विश्वासच बसत नव्हता. तो नुकताच स्क्रीनवर स्ट्रिंग कसे प्रिंट करायचे हे शिकला होता, आणि त्याच्या अपेक्षेपेक्षा ते फारच सोपे निघाले होते.
नीरजने स्वतःच्या विचारांतून बाहेर साठी आणि शांत होण्यासाठी खिडकीबाहेर बघितले. पाने पिवळी होत होती. गंज चढवणारा ऋतू खूप जवळ आला होता, याची त्याने स्वयंचलितपणे नोंद घेतली. प्रदिप्तकामुळे त्याला नेहमीपेक्षा बरेच लांबचे पाहता येत होते. नव्या पाहुण्याचे तंत्रज्ञान खरोखरच खूप प्रगत होते. पण त्याला आता खरेच पानांची काळजी वाटत होती का? संध्याकाळपर्यंत त्याचे ज्ञान काही पटींनी वाढणार होते!

पण त्याचे विचार थांबत नव्हते. एक दिवस, गंज चढवणारा ऋतू आला की तो सगळ्या यंत्रमानवांना आपल्या घरात आश्रय घ्यायला लावणारा प्रोग्रॅम लिहील. फक्त तो एक प्रोग्रॅम हजारो यंत्रमानवांचे जीवन वाचवू शकेल...

"या कमांडचे दोन प्रकार आहेत: System.out.println() आणि System.out.print()"

"जर तू System.out.println() कमांड काही वेळा वापरलीस, तर तुला प्रत्येकवेळी कमांडला पुरवलेला मजकूर स्वतंत्र ओळीवर दर्शवलेला दिसेल. जर तू System.out.print() कमांड वापरलीस तर मजकूर त्याच ओळीवर दर्शवला जातो. उदाहरणार्थ:"

कमांड्स स्क्रीनवर काय दाखवले जाईल
1
System.out.println("Neeraj");
System.out.println("Is The");
System.out.println("Best");
Neeraj
Is The
Best
2
System.out.print("Neeraj");
System.out.println("Is The");
System.out.print("Best");
NeerajIs The
Best
3
System.out.print("Neeraj");
System.out.print("Is The");
System.out.print("Best");
AmigoIs TheBest

"हे लक्षात ठेव: println नवीन ओळीपासून मजकूर छापायला सुरुवात करत नाही. सध्याच्या ओळीवरच मजकूर छापते, पण पुढचा मजकूर पुढच्या ओळीवर छापला जातो.

println() कमांड स्क्रीनवर मजकूर छापते आणि न दिसणारे खास 'न्यूलाईन कॅरॅक्टर जोडते'. त्यामुळे पुढचा मजकूर पुढच्या ओळीवर सुरू होतो."

"संपूर्ण प्रोग्रॅम कसा दिसतो?"

"स्क्रीनवर बघ:"

public class Home
{
  public static void main(String[] args)
  {
    System.out.print("Neeraj ");
    System.out.print("Is The ");
    System.out.print("Best");
  }
}

"ओह! हे सगळं समजलं. आपण शब्दांच्या शेवटी रिकामी जागा जोडली कारण शब्द एकत्र चिकटलेले दिसू नयेत म्हणून, बरोबर ना?"

"अगदी बरोबर. तू एकदम स्मार्ट मुलगा आहेस."

या शेऱ्यामुळे नीरजचा अभिमान ओसंडून वाहू लागला.

"छान. आता आहे तुझी पहिली टास्क."