CodeGym /Java Course /जावा सिंटॅक्स /इरा, व्हेरीएबल्स, आणि डेटा टाईप्स

इरा, व्हेरीएबल्स, आणि डेटा टाईप्स

जावा सिंटॅक्स
पातळी 0 , धडा 4
उपलब्ध
image-ru-00-14

गुलाबी केस असलेल्या एक स्त्रीने केबिनमध्ये प्रवेश केला. "सगळ्या मानवी स्त्रियांचे केस असेच असतात का काय," नीरजला विचार करायला जमले.

"नमस्कार! माझे नाव इरावती काणे आहे. तू मला इरा म्हणू शकतोस. मी गॅलॅक्टिक रशची मार्गनिर्देशक आहे."

" नमस्कार, इरा," नीरजला स्वत:च म्हणायची इच्छा झाली.

"मी संपूर्ण जावा भाषेचा सर्वांत रंजक भाग समजावून सांगणार आहे: व्हेरीएबल्स."

मी ऐकायला तयार आहे. तू म्हणते आहेस ते व्हेरीएबल्स म्हणजे काय?"

"व्हेरीएबल्स म्हणजे डेटा साठवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या खास गोष्टी आहेत. कोणताही डेटा. जावामध्ये, सगळा डेटा व्हेरीएबल्समध्ये साठवलेला असतो. सर्वांत जवळची उपमा द्यायची तर हे एक खोके आहे."

"एक खोके? "कोणत्या प्रकारचे खोके?"

"फक्त एक जुने खोके. समजा, तू कागदाच्या एक तुकड्यावर 13 हा आकडा लिहिलास आणि तो एका खोक्यात ठेवलास. आता आपण म्हणू शकतो की खोक्यात 13 हे मूल्य साठवलेले आहे."

"जावामध्ये, प्रत्येक व्हेरीएबलचे तीन महत्त्वाचे गुणधर्म असतात: प्रकार, नाव, आणि मूल्य."

"म्हणजे काय ते तू जरा स्पष्ट करतेस का?"

"नक्की. दोन व्हेरीएबल वेगवेगळे आहेत, ते कळावे म्हणून आपण त्यांना नाव देतो. हे म्हणजे खोक्याला एक लेबल लावावे तसे आहे."

"व्हेरीएबलच्या प्रकारावरून त्याच्यात कोणत्या प्रकारची मूल्ये/डेटा साठवता येतात ते ठरते. आपण टोपी टोप्यांच्या खोक्यात ठेवतो, बूट बुटांच्या खोक्यात ठेवतो, इ."

"मूल्य म्हणजे व्हेरीएबलमध्ये साठवलेली विशिष्ट ऑब्जेक्ट, डेटा, किंवा माहिती."

"तू मला प्रकारांविषयी अजून सांगशील का?"

"नक्की. जावामधले प्रत्येक ऑब्जेक्ट एका विशिष्ट प्रकारचे असते. काही उदाहरणे म्हणजे पूर्णांक, अपूर्णांक, मजकूर, मांजर, घर, इ."

"व्हेरीएबललासुद्धा एक प्रकार असतो. फक्त त्याच्यासारखा प्रकार असलेले मूल्यच तो साठवू शकतो."

"तू हे प्रत्यक्ष आयुष्यात पाहू शकतोस. वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी साठवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची खोकी वापरली जातात:"

"व्हेरीएबल तयार (किंवा डीक्लेअर) करायला आपण प्रकाराचे नाव वापरतो: प्रकाराचेनाव व्हेरीएबलचेनाव."

"ही काही उदाहरणे आहेत:"

व्हेरीएबल डीक्लेअर करण्यासाठी:
आधी प्रकार, नंतर नाव.
वर्णन
1
int a;
aनावाचा एक इंट व्हेरिएबल तयार कर.
2
String s;
s नावाचा एक स्ट्रिंग व्हेरीएबल तयार करा.
3
double c;
c नावाचा एक डबल व्हेरीएबल तयार करा.

"सर्वांत जास्त वापरले जाणारे प्रकार आहेत इंटीजर्स (intहा शब्द वापरून डीक्लेअर केले जाणारे) आणि मजकूर (Stringहा शब्द वापरून डीक्लेअर केले जाणारे)

"डबल म्हणजे काय?"

"डबल्स म्हणजे अपूर्णांक, किंवा वास्तव संख्या."

"तू म्हणालीस प्रत्येक व्हेरीएबलचे तीन महत्त्वाचे गुणधर्म असतात: प्रकार, नाव, आणि मूल्य. पण मला तर दोनच कळले. तर, माझा प्रश्न आहे, आपण व्हेरीएबलला मूल्य कसे देतो?"

"आपण खोक्याच्या उपमेकडे परत जाऊया. समजा, तू कागदाचा तुकडा घेतलास, त्यावर 42 हा आकडा लिहिलास आणि तो एका खोक्यात ठेवलास. आता खोक्यात 42 हे मूल्य साठवले गेले."

"बरं."

"आपण व्हेरीएबल्सना मूल्य देण्यासाठी एक खास प्रक्रिया (असाईनमेंट) वापरतो. असाईनमेंटमुळे मूल्य एका व्हेरीएबलमधून दुसऱ्या व्हेरीएबलमध्ये कॉपी होते. ते मूल्य हलवत नाही. तर कॉपी करते. डिस्कवरच्या फाईलसारखे. तर ते असे दिसेल:"

कोड वर्णन
1
i = 3;
व्हेरीएबल i ला 3 हे मूल्य द्या.
2
a = 1;
b = a+1;
व्हेरीएबल a ला 1 हे मूल्य द्या.
व्हेरीएबल b ला 2 हे मूल्य द्या.
3
x = 3;
x = x + 1;
व्हेरीएबल x ला 3 हे मूल्य द्या.
पुढच्या ओळीवर, x चे मूल्य 1 ने वाढते, त्यामुळे x चे मूल्य 4 होते.

"असाईनमेंट प्रक्रिया करण्यासाठी, आपण बरोबरचे चिन्ह (=) वापरतो."

"मी पुन्हा एकदा सांगते: यामध्ये तुलना केली जात नाही. आपण बरोबरच्या चिन्हाच्या उजवीकडचे मूल्य डावीकडच्या व्हेरीएबलमध्ये कॉपी करत आहोत. जावा मध्ये तुलना करण्यासाठी, बरोबरची दोन चिन्हे एकत्र वापरतात (==)."

"मांजराला व्हेरीएबलमध्ये कसे घालायचे मला माहिती आहे. ते जवळजवळ एका प्रोग्रॅमसारखेच आहे."

"मांजर कसे पकडायचे:

1. एक रिकामे खोके घ्या.

2. थांबा."

"नाही, नीरज. तू एका खोक्यात एकाच मांजराला कोंबू शकतोस. म्हणजे, तू एका व्हेरीएबलला केवळ एकच मूल्य देऊ शकतोस."

"बरं. तू मला व्हेरीएबल्स तयार करायची अजून काही उदाहरणे सांगशील का?"

"ठीक आहे. मी परत सांगते: व्हेरीएबल तयार (किंवा डीक्लेअर) करायला आपल्याला «प्रकाराचेनाव व्हेरीएबलचेनाव» याचे नाव वापरावे लागते."

कोड स्पष्टीकरण
1
String s;
s नावाचा एक स्ट्रिंग व्हेरीएबल तयार करण्यात आला आहे.
या व्हेरीएबलमध्ये मजकूर साठवता येतो.
2
int x;
x नावाचा एक इंट व्हेरीएबल तयार करण्यात आला आहे.
हा व्हेरीएबल पूर्णांक संख्या साठवू शकतो.
3
int a, b, c;
int d;
a, b, c, आणि d नावाचे int व्हेरीएबल्स तयार करण्यात आले.
हे व्हेरीएबल्स पूर्णांक संख्या साठवू शकतात.

"हं, आता मला समजले!"

"लक्षात ठेव की एकाच मेथडमध्ये सारख्याच नावाचे दोन व्हेरीएबल्स तू तयार करू शकत नाहीस."

"आणि वेगवेगळ्या मेथड्समध्ये?"

"हो. तसे करता येते. ते म्हणजे दोन वेगवेगळ्या घरात खोकी ठेवल्यासारखे झाले."

"मी व्हेरीएबलला काय हवे ते नाव देऊ शकतो का?"

"बऱ्याचदा. व्हेरीएबलच्या नावांमध्ये रिकामी जागा, +, -, इ. असू शकत नाहीत. व्हेरीएबलच्या नावांमध्ये फक्त अक्षरे आणि आकडे वापरणे सगळ्यात चांगले."

"लक्षात ठेव की जावा केस-सेन्सिटीव्ह आहे. int a आणि Int a हे सारखे नाही."

"अजून एक गोष्ट, जावामध्ये तुम्हाला व्हेरीएबल तयार करता येतो आणि त्याचवेळी त्याला मूल्य देता येते. त्यामुळे वेळ आणि जागा वाचते."

सुटसुटीत कोड तेच काम करणारा पण जास्त मोठा कोड
1
int a = 5;
int b = 6;
int a;
a = 5;
int b;
b = 6;
2
int c = 7;
int d = c+1;
int c;
c = 7;
int d;
d = c+1;
3
String s = "I'm Neeraj";
String s;
s = "I'm Neeraj";

"ही पद्धत जास्त सुटसुटीत आणि स्पष्ट आहे."

"आपलं हे असंच आहे!"

"जावा शिकणाऱ्या प्रत्येक नव्या व्यक्तीला दोन प्रकार माहिती असणे आवश्यक आहे: int (integers) आणि String (text/strings)."

"int प्रकारात आपल्याला व्हेरीएबल्समध्ये संख्या साठवता येतात आणि त्यावर: बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, इ. क्रिया करता येतात."

कोड स्पष्टीकरण
1
int x = 1;
int y = x*2;
int z = 5*y*y + 2*y + 3;
x चे मूल्य 1
y चे मूल्य 2
z चे मूल्य 20+4+3, म्हणजेच 27
2
int a = 5;
int b = 1;
int c = (a-b) * (a+b);
a चे मूल्य 5
b चे मूल्य 1
c चे मूल्य 4*6, म्हणजेच 24
3
int a = 64;
int b = a/8;
int c = b/4;
int d = c*3;
a चे मूल्य 64
b चे मूल्य 8
c चे मूल्य 2
d चे मूल्य 6

"कळले. प्रोग्रॅमिंग नेहमीच एवढे सोपे असते का?"

"खरेतर, हो."

"छान! मग, पुढे काय?"

"स्ट्रिंग प्रकारात आपल्याला मजकुराच्या ओळी साठवता येतात, त्यांनासुद्धा 'स्ट्रिंग्ज' असे म्हणतात."

"जावामध्ये स्ट्रिंग असाईन करण्यासाठी, आपल्याला मजकूर अवतरण चिन्हात लिहावा लागतो. ही काही उदाहरणे आहेत:"

कोड स्पष्टीकरण
1
String s = "Neeraj";
s मध्ये "Neeraj" आहे.
2
String s = "123";
s मध्ये "123" आहे.
3
String s = "123 + 456";
s मध्ये "123 + 456" आहे.

"कळले. हे फार अवघड वाटत नाही."

"तुझ्यासाठी अजून एक गंमत आहे."

"तू दोन्ही स्ट्रिंग्ज अधिक चिन्हाने जोडू शकतोस (+). ही उदाहरणे पहा."

कोड स्पष्टीकरण
1
String s = "Neeraj" + " is the best";
s मध्ये "Neeraj is the best" आहे.
2
String s = "";
s मध्ये एक रिकामा स्ट्रिंग आहे - कोणतीही चिन्हे नसलेला एक स्ट्रिंग.
3
int x = 333;
String s = "Neeraj" + x;
s मध्ये "Neeraj333" आहे.

"म्हणजे, आपल्याला स्ट्रिंग्ज संख्यांना जोडता येतात का?"

"हो, पण लक्षात ठेव जेव्हा आपण स्ट्रिंग्ज संख्यांना जोडतो, तेव्हा उत्तर नेहमीच एक स्ट्रिंग असतो."

"मला तुझ्या उदाहरणावरून ते समजले."

"जर तू एवढा स्मार्ट असशील तर, व्हेरीएबल स्क्रीनवर कसा दर्शवायचा ते ठरव."

"हं. व्हेरीएबल? स्क्रीनवर? काहीच सुचत नाही."

"खरेतर, अगदीच सोपे आहे. स्क्रीनवर काहीतरी दर्शवण्यासाठी, आपण System.out.println() कमांड वापरतो, आणि आपल्याला जे काही छापायचे आहे ते अर्ग्युमेंट म्हणून पाठवतो."

कोड स्क्रीन आऊटपुट:
1
System.out.println("Neeraj");
Neeraj
2
System.out.println("Nee"+"raj");
Neeraj
3
String s = "Neeraj";
System.out.println(s);
Neeraj
4
String s = "Neer";
System.out.println(s+"aj");
Neeraj

"अ-हा! आता सगळे अजून स्पष्ट समजले."

"छान. तुझ्यासाठी अजून तीन स्वाध्याय आहेत."

टिप्पण्या
TO VIEW ALL COMMENTS OR TO MAKE A COMMENT,
GO TO FULL VERSION