image-ru-00-21

वा, अजून एक मानवी स्त्री. पण काळ्या केसांची. कसलं भारी!"

"हाय, माझे नाव किम आहे."

"हाय, माझे नाव नीरज आहे!"

मला माहिती आहे. मीच तुझे नाव ठेवले आहे. धीरजला स्वत: त्याबद्दल काही विचार करता आला नसता."

नीरजचे विचार पुन्हा इलेक्ट्रॉन्सच्या वेगाने सुरू झाले. “हं...किती चांगली आहे ही... तिला यंत्रमानव आवडत असतील?”

“चला, धड्याकडे परत जाऊया. तुला समजावून सांगायला मी सोपे शब्द वापरेन.”

"ठीक आहे."

“प्राध्यापक निपुण आणि ऋषी यांनी जे सांगितले त्यात मला थोडी भर घालायला आवडेल.”

“जावामध्ये, आपण कमांड्स लिहू शकतो, पण कोडमध्येच त्या कमांड्ससाठी आपण कॉमेंट्ससुद्धा लिहू शकतो. कम्पायलर कॉमेंट्सकडे पूर्णपणे दुर्लक्ष करतो. प्रोग्रॅम रन करताना सर्व कॉमेंट्स वगळल्या जातात."

"तू मला कृपया एक उदाहरण देशील का?"

"हो, नक्की:"

public class Home
{
  public static void main(String[] args)
  {
    /*
    आता आपण 'Neeraj Is The Best' हे वाक्य स्क्रीनवर छापूया
    */
    System.out.print("Neeraj ");
    System.out.print("Is ");
    System.out.print("The ");
    System.out.print("Best");
  }
}  

“आपण सुरुवातीला(/*) ही चिन्हे, आणि शेवटी (*/) चिन्हे, अशी चिन्हांची जोडी वापरून 'आता आपण... हे वाक्य स्क्रीनवर छापूया' अशी कॉमेंट लिहीली. जेव्हा प्रोग्रॅम कम्पाईल होतो तेव्हा /* आणि */." या चिन्हांमधले सर्व काही कम्पायलर वगळतो.

“म्हणजे मला काय पाहिजे ते मी लिहू शकतो का?”

"हो. सामान्यपणे, कोडमधल्या कॉमेंट्स कोडमधल्या समजायला अवघड भागाबद्दल असतात. काही कॉमेंट्स मध्ये डझनभर स्ट्रिंग्स असतात, या बहुतेक वेळा मेथड्स च्या आधी लिहिलेल्या असतात आणि या मेथड्स कशाप्रकारे काम करतात यातील बारकावे सांगतात."

“कोडमध्ये कॉमेंट्स घालायचा अजून एक मार्ग आहे. आपण दोन फॉरवर्ड स्लॅशेस वापरू शकतो(//)."

public class Home
{
  public static void main(String[] args)
  {
    System.out.print("Neeraj ");
    System.out.print("Is The "); //ही सुद्धा एक कॉमेंट आहे
    System.out.print("Best");
  }
}

“इथे, // पासून सुरू होणारा आणि // असलेल्या त्या ओळीच्या शेवटपर्यंतच्या कोडला कॉमेंट असे म्हणतात. वेगळ्या शब्दांत सांगायचे तर, 'कॉमेंट पूर्ण करण्यासाठी' चिन्हांची दुसरी जोडी वापरली जात नाही."

"अजून एक म्हणजे, काही कॉमेंट खरेच रंजक असतात.”

//मी या कोडसाठी जबाबदार नाही. माझ्या इच्छेविरुद्ध मला हा कोड लिहायला लावण्यात आला आहे.
// भविष्यातल्या मी, कृपया मला माफ कर.
// मी किती दिलगीर आहे, हे मी सांगूसुद्धा शकत नाही.
// जर मला यासारखे काही पुन्हा दिसले तर, मी काम करताना पूर्ण मोडून जाईन.
// जर ही अट कधी खरी ठरली,
// तर मला बक्षीस देण्यासाठी माझ्याशी संपर्क साधा. फोन नंबर: xxx-xxx-xxx.
// प्रिय कोडची देखभाल करणाऱ्या व्यक्तीस,
// एकदा हे रूटीन ऑप्टीमाइझ करायचे तुझे प्रयत्न संपले,
// आणि ही किती भयंकर चूक होती, हे तुझ्या लक्षात आले की,
// पुढच्या माणसासाठी धोक्याची सूचना
// म्हणून कृपया हा काऊन्टर वाढव.
// total_hours_wasted_here = 42
// जेव्हा मी हे लिहीले तेव्हा मी काय करत होते ते केवळ देवाला आणि मला समजले.
// आता, फक्त देवाला माहिती आहे
// कधीकधी माझा विश्वास असतो की कम्पायलर माझ्या सगळ्या कॉमेंटसकडे दुर्लक्ष करतो.
// हा सर्व कोड, तसेच माझे सर्व काम मी माझी बायको, स्मिताला समर्पित करतो. 
// एकदा हा कोड प्रसिद्ध झाला की मी आणि माझी तीन मुले 
// आणि आमचा कुत्रा यांना तिचाच आधार आहे.
// आत्ता थोडी चढलीय, नंतर दुरुस्त करेन.
// जादू. हात लावू नका

"हो, काही कॉमेंट्स खूपच गंमतीशीर आहेत."

"आजच्यासाठी एवढेच."

"हा एक छोटा पण मनोरंजक धडा होता. धन्यवाद, किम.”