"मीच आलोय परत. मी आज तुला तीन धडे शिकवणार आहे. आणि हा दुसरा आहे! आरामात बस आणि ऐक. मी तुला स्क्रीनवर मजकूर दाखवण्याबद्दल सांगणार आहे. हे खरेतर अगदी सोपे आहे:"

जावा कोड स्क्रीनवर काय दाखवले जाईल
System.out.println("Dheeraj");
System.out.println(3);
System.out.println("Rain" + "In" + "Spain");
Dheeraj
3
RainInSpain
System.out.println(1 + 3);
System.out.println("1" + "3");
System.out.println(1 + "3");
System.out.println("1" + 3);
System.out.println("1" + (1 + 3));
4
13
13
13
14
System.out.println("Neeraj is the best!");
System.out.println("Neeraj" + "is the best!");
System.out.println("Neeraj" + " " + "is the best!");
Amigo is the best!
Amigois the best!
Amigo is the best!
System.out.println(3 * 3 + 4 * 4);
System.out.println(1 * 2 + 3 * 4);
25
14
System.out.print("Dheeraj");
System.out.print("Dheeraj");
System.out.print("Dheeraj");
DheerajDheerajDheeraj
System.out.print("Dheeraj ");
System.out.println("is the best!");
System.out.print("Neeraj ");
System.out.println("is the best!");
Dheeraj is the best!
Neeraj is the best!
1
टास्क
जावा सिंटॅक्स,  पातळी 1धडा 7
लॉक केलेले
बग्ज(चुका) शोधणे
कधीही प्रोग्रॅमिंगमध्ये चूक न केलेला असा कुणी तू मला दाखवलास तर आपण एक गोष्ट खात्रीने सांगू शकतो की: तू नक्कीच मानवाबद्दल बोलत नाही आहेस. बग-मुक्त प्रोग्रॅमिंग शक्यच नसते. पण हे एवढे भीतीदायक नाही. सर्वांत महत्त्वाची गोष्ट आहे 'बग्स असणे अपरिहार्य आहे' हे लगेचच मान्य करणे. आपण बग्ज शोधतो (किंवा व्यावसायिक कधीकधी म्हणतात त्याप्रमाणे "कॅच" करतो) आणि ते दुरुस्त करतो.

"तू मला print() आणि println() याबद्दल अजून एकदा सांगशील का?"

"print() फंक्शन स्क्रीनवर मजकुराचे एक एक अक्षर दाखवण्यासाठी वापरले जाते. जेव्हा स्क्रीनवरच्या ओळीची जागा संपते, तेव्हा मजकूर पुढच्या ओळीवर लिहायला सुरुवात होते. ओळ भरण्याआधीच सध्याच्या ओळीवर मजकूर दाखवणे थांबवण्यासाठी तू println() फंक्शन वापरू शकतोस. पुढचा मजकूर पुढच्या ओळीवर दिसेल."

"ठीक आहे. आणि संख्या आणि स्ट्रिंग्ज एकत्र करायची युक्ती काय आहे?"

"जर तू दोन संख्या एकत्र केल्यास, तर उत्तरसुद्धा एक संख्याच असते: 2+2 बरोबर 4 जर तू एक संख्या आणि एक स्ट्रिंग एकत्र केलेस तर, संख्येचे स्ट्रिंगमध्ये रूपांतर केले जाते. मग दोन्ही स्ट्रिंग्ज एकत्र जोडले जातात."

"ओह! उदाहरणे बघून मला तसेच वाटले, पण काय माहिती. या रंजक धड्याबद्दल धन्यवाद, इरा."

"त्यात काय एवढं. आणि शेवटी, धीरजने दिलेल्या काही टास्क्स आहेत. मी तुझी प्रगती तपासून पहावी असे त्याला वाटते आहे."

1
टास्क
जावा सिंटॅक्स,  पातळी 1धडा 7
लॉक केलेले
आपल्याला अतिरिक्त ओळी नको आहेत
अननुभवी आणि, कधीकधी अनुभवी प्रोग्रॅमर्ससुद्धा अनावश्यक कोड तयार करतात. गरज पडलीच तर असावा म्हणून. उदाहरणार्थ, ते डझनभर व्हेरीएबल्स डीक्लेअर करतात आणि मग त्यांचे काय करायचे ते त्यांना समजत नाही. या टास्कमध्ये, कुणीतरी काहीतरी विचित्र केले आहे, आणि आपल्याला ते दुरुस्त करायचे आहे. न वापरलेले व्हेरीएबल्स शोध आणि ते कम्पायलरपासून लपवण्यासाठी त्यांचे कमेंटमध्ये रुपांतर कर.
1
टास्क
जावा सिंटॅक्स,  पातळी 1धडा 7
लॉक केलेले
कोडचा प्रवेश
कधीकधी आपल्याला विचार करावा लागत नाही, फक्त काम करत राहावे लागते! हे वाक्य विरोधाभासात्मक वाटले तरी, कधीकधी तुमची बोटे तुमच्या सबोध मनापेक्षा जास्त चांगले "लक्षात" ठेवतात. त्यामुळेच सिक्रेट कोडजिम केंद्रात प्रशिक्षण घेताना तुम्हाला काहीवेळा अशा टास्क्स मिळतील, ज्यात तुम्हाला कोड लिहावा लागेल. कोड लिहीला की, तुम्हाला सिंटॅक्सची सवय होते आणि थोडी डार्क मॅटर मिळते. अजून काय, तुम्ही आळशीपणाशी लढता!