"माझी पाळी. ठीक आहे, ऐक."

काही शास्त्रज्ञांनी एक परमसंगणक तयार केला. तो इतका ताकदवान होता की तो कोणत्याही प्रश्नाचे उत्तर सांगू शकायचा. तर, त्यांनी त्यांचा प्रश्न विचारला:
"देव अस्तित्वात आहे का?"
संगणकाने विचार करायला सुरुवात केली. थोडा आवाज झाल्यावर आणि दिव्यांची उघडझाप झाल्यावर, तो म्हणाला:
"पुरेशी माहिती नाही. मला आपल्या ग्रहावरील सर्वांत जास्त ताकदवान संगणकाला जोडा."
शास्त्रज्ञांनी डोकी खाजवली आणि त्याची गंमत करायचे ठरवले. पुन्हा, त्यांनी विचारले:
"देव अस्तित्वात आहे का?"
अजून थोडा आवाज आणि दिव्यांची उघडझाप, आणि संगणकाने उत्तर दिले:
"पुरेशी माहिती नाही. मला पृथ्वीवरच्या सर्व संगणकांना जोडा."
हे करणे थोडे जास्त अवघड होते, पण शास्त्रज्ञांनी त्याला अस्तित्वात असलेल्या सर्व संगणकांना जोडणे जमवले. पुन्हा, त्यांनी त्यांचा प्रश्न विचारला. आणि पुन्हा, संगणक म्हणाला:
"पुरेशी माहिती नाही. मला सगळ्या नेटवर्क्सना जोडा, सगळ्या संगणन करणाऱ्या उपकरणांना, इ. जोडा."
शास्त्रज्ञांनी भरपूर प्रयत्न करून ही विनंती पूर्ण केली. शेवटी, त्यांनी अजून एकदा विचारले:
"देव अस्तित्वात आहे का?"
उत्तर:
"आता अस्तित्वात आहे."