CodeGym /Java Course /जावा सिंटॅक्स /पातळी 0 चा सारांश

पातळी 0 चा सारांश

जावा सिंटॅक्स
पातळी 0 , धडा 8
उपलब्ध
image-ru-00-24

"हाय, मी धीरज. मी तुझ्यासारखाच एक यंत्रमानव आहे, पण माझी निर्मिती क्युबामधल्या हवाना येथे केली गेली."

"हाय, धीरज!"

"कसे काय झाले तुझे आत्तापर्यंतचे प्रशिक्षण?"

"मी केलेला आत्तापर्यंतचा सगळ्यात मस्त प्रोग्रॅमिंग अभ्यासक्रम आहे हा. नाही, त्यापेक्षा मस्त: माझ्या आयुष्यातला सर्वांत चांगला प्रोग्रॅमिंग अभ्यासक्रम, अगदी नक्की. मी कल्पना केली असती त्यापेक्षा कितीतरी चांगला."

"आपलं हे असंच आहे!"

"सगळे धडे एवढेच मनोरंजक आहेत?!"

"अरे, पैज लाव. यापेक्षा चांगले होत जातील. कंटाळवाणे धडे म्हणजे 21 व्या शतकातली गोष्ट! खडूने फळ्यावर लिहायची कल्पना करू शकतोस का तू! 1400 पासून काहीच बदललेले नव्हते. मला वाटतेय तेव्हा रस्त्यावर डायनॉसॉर्स फिरत असतील."

"खरेच आहे. आता पुढे काय?"

"तू पुढच्या पातळीकडे जात आहेस. अजून 39 धडे आणि मग तू नोकरी शोधू शकतोस."

आज तू हे शिकलास:

  • व्हेरीएबल्स
  • स्क्रीनवर मजकूर दाखवणे
  • इंट आणि स्ट्रिंग प्रकार
  • जावा आणि इतर भाषांमध्ये कम्पाइल करण्यातला फरक
  • कोडमध्ये कोमेंट्स घालणे आणि त्यांची गरज

"भारी!"

"अर्थात, इथून पुढच्या पातळ्या याच्याएवढ्या सोप्या नसतील, पण त्या हळूहळू अवघड होत जातील. स्वाध्यायांचे पण तसेच आहे."

"हे जिमला जाण्यासारखे आहे: आपण उचलायची वजने हळूहळू वाढवतो, आणि 6 महिन्यानंतर, शिकाऊ माणूस सुद्धा बेंच प्रेसवर 220 पौंड वजन उचलू शकतो."

"कूल! मला दोन्हीही हवेय. बेंच प्रेस आणि नोकरी!"

"बरं, तू एवढा उत्साही असल्यामुळे, अजून एक-दोन टास्क आहेत, डॉन धीरज स्टाईल."

टिप्पण्या
TO VIEW ALL COMMENTS OR TO MAKE A COMMENT,
GO TO FULL VERSION