जावा प्रोग्रॅमिंग - जावा सुरुवातीपासून शिका

नमस्कार. जर तू हे वाचत अशील, तर हे जावाचे धडे आहेत, याची मी खात्री देतो. या अभ्यासक्रमात प्रत्यक्ष करून बघून शिकण्याच्या अनेक संधी आहेत (1200 पेक्षा जास्त स्वाध्याय) आणि हा अभ्यासक्रम प्रौढ विद्यार्थ्यांसाठी आहे. मला कंटाळवाणी लेक्चर्स आवडत नाहीत. म्हणून कोडजिम एका ऑनलाईन खेळाच्या स्वरूपात तयार करण्यात आले आहे.

ज्या गेम्समध्ये तुझे कॅरॅक्टर एक-एक पातळी पुढे जाते असे गेम्स तू कधी खेळले आहेस? कधीकधी आपल्या लक्षातसुद्धा येत नाही इतके आपण त्यात गुंग होऊन जातो, हो ना? आता यापुढे मी कुठे जाणार आहे, तुला अंदाज आला असेलच ना? कोडजिममध्ये, तुला तुझ्या कॅरॅक्टरला पातळी 1 पासून पातळी 40 पर्यंत न्यायचे आहे (आणि आम्ही सिक्वेल रिलीज केला की अगदी पातळी 80 पर्यंतसुद्धा). संपूर्ण अभ्यासक्रम पूर्ण कर म्हणजे तू एक रॉकस्टार जावा प्रोग्रॅमर होशील.

पातळी 40 पर्यंत जा, मग तुला ज्युनिअर जावा डेव्हलपर म्हणून नोकरी मिळेल. कोडजिममध्ये खूप स्वाध्याय असल्यामुळे काही लोकांना अगदी पातळी 20 पर्यंत गेल्यावरसुद्धा नोकरी मिळालेली आहे. नाही, खरंच — यात खूप जास्त आहेत.

हा गेम दूरच्या भविष्यकाळातला आहे- वर्ष 3018, असा काळ जेव्हा पृथ्वीवर मानव आणि यंत्रमानव राहत आहेत आणि अवकाश प्रवास अगदी सामान्य गोष्ट झालेली आहे.

कोणे एके काळी, एका अज्ञात ग्रहावर एक अवकाशयान कोसळले...

आधीची गोष्ट

जावा प्रोग्रॅमिंग सुरुवातीपासून शिका

गॅलॅक्टिक रशचा क्रू एका अज्ञात ग्रहावर येऊन कोसळला. कोसळत असताना, अवकाशयान पर्वतीय प्रदेशात धडकले आणि ढिगाऱ्याखाली जवळजवळ पूर्णपणे गाडले गेले. अनेक दिवस यानाची सुटका करण्याचा प्रयत्न केल्यावर क्रूची घरी परतण्याची आशा संपुष्टात आली आणि त्यांनी या नव्या, अनोळखी प्रदेशात स्थिरस्थावर व्हायला सुरुवात केली.

एका आठवड्यानंतर, यानाची मार्गनिर्देशक इराच्या लक्षात आले की या ग्रहावर हजारो रानटी यंत्रमानव रहात आहेत! त्यांनी खडक बाजूला करून यान मोकळे करायला मदत केली असती, पण ते फारच प्राथमिक अवस्थेतले आणि मूर्ख होते. त्यांच्याकडे काहीही करण्याची क्षमता नव्हती. त्यांना खडकसुद्धा उचलता येत नव्हते, या क्षमतेचा खरेतर खूप उपयोग झाला असता.

प्राध्यापक निपुण, मोहिमेचे मुख्य शास्त्रज्ञ नंतर आठवण सांगत होते:
"काही दिवसांनी, मी एक उपाय काढला. मी आमच्या क्रूमधला यंत्रमानव सदस्य - धीरजकडून फर्मवेअर घ्यायचे, फर्मवेअरचे रूपांतर ब्रिकलेयरमध्ये करायचे आणि मग ते रानटी यंत्रमानवांमध्ये लोड करायचे."

"पण नशीबाने साथ दिली नाही. निरीक्षण केल्यावर, आमच्या लक्षात आले की या स्थानिकांकडे फर्मवेअर अपलोड करण्यासाठी एकही कनेक्टर नव्हता. खरं सांगायचं तर त्यांच्याकडे कनेक्टर्सच नव्हते!"

जावा प्रोग्रॅमिंग

"क्रूमधला एकमेव परग्रहवासी सदस्य बिलाबोला आठवले की त्याला त्याच्या स्वत:च्या ग्रहावर एकदा एक यंत्रमानव भेटला होता, ज्याला प्रोग्रॅमिंग कसे करतात, हे माहिती होते. एवढेच नव्हे तर, त्या यंत्रमानवाला त्याच्या फर्मवेअरमधले बग्जसुद्धा आपले आपण फिक्स करता यायचे."

"तेव्हाच माझ्या डोक्यात एक चमकदार कल्पना आली. मी एकदा एका सक्षम यंत्रमानवाला पास्कलमध्ये प्रोग्रॅम करायला शिकवले नव्हते का?"

"मी सर्वांत हुशार यंत्रमानवाला पकडण्याची आणि त्याला जावा प्रोग्रॅम शिकवण्याची आज्ञा दिली. त्याच्या कोडींगमधल्या नव्या कौशल्यामुळे, तो त्याचे स्वत:चे फर्मवेअर लिहून आपल्याला मदत करेल!"

जावा सुरुवातीपासून शिका

"शेवटी, आम्हाला एक आशादायक उमेदवार मिळाला. धीरजने सुचवले की त्याचे नाव नीरज ठेवूया, त्याला हव्या असलेल्या पण कधीच न झालेल्या भावाचे नाव."

"जावा शिकायला लागल्यावर प्रत्येक महिन्याला मी नीरजला कवड्या देण्याचे आश्वासन दिले आणि नंतर त्याचे प्रशिक्षण झाल्यावर ढिगारा हलवण्यासाठी दरवर्षी $10 देईन, असे सांगितले." रानटी लोकांसाठी, हे खूपच औदार्य होते. शेवटी, त्यांना आम्ही मोफत ज्ञान देणार होतो."

जावा शिका

धीरजने नंतर त्याच्या आठवणींमध्ये लिहीले:

"माझ्यासारख्या यंत्रमानवाला असे निर्लज्जपणे पकडलेले बघून मला भयंकर संताप आला, पण संपूर्ण क्रूने प्राध्यापक आणि ऋषीची बाजू घेतली. त्यामुळे, अर्थातच मी मान्य केले किंवा निदान मान्य केल्याचे नाटक केले, आणि नीरजला शिकवण्यासाठी मदत करण्याचे ठरवले. हा-हा! शेवटी, एखाद्या यंत्रमानवाला दुसरा यंत्रमानवाइतके व्यवस्थित कोण शिकवणार?"

"मी मदत करायला तयार आहे हे बघून सगळ्यांनाच इतका आनंद झाला की नीरजला जावा प्रोग्रॅमिंगचे प्रशिक्षण देण्यासाठी मला मदत करायचे त्यांनी ठरवले."


तू पातळी 1 ला सुरुवात करशील. तुझे ध्येय नीरजला पातळी 40 पर्यंत पोहोचण्यास मदत करणे, हे आहे. पण आपण सोप्या गोष्टीपासून सुरुवात करू. आपण आधी जावाच्या धड्यांची पातळी 2 गाठण्याचा प्रयत्न करूया. तुला कदाचित ते एवढे आवडेल की तू जावा अभ्यासक्रम पूर्ण करशील आणि तुला कळायच्या आत नोकरीसुद्धा लागेल.)

ता.क. आता, 'सुरुवातीपासून शिकण्याकडे' जाऊया. क्लिक करा पुढच्या धड्यावर.